Monday, December 28, 2009

भारतीयांवर मनुवादी विचाराने व मनुस्मृतीच्या कायद्याने मोठा अन्याय केले आहे. मनुस्मृतीमुळे देशातला बहुसंख्य असलेला बहुजन समाज हक्क अधिकारापासून वंचित राहिला. ब्राह्माण, क्षत्रिय, वैश्य व शूद असे चार वर्ण परंतु कलियुगामध्ये ब्राह्माण व शूद हे दोनच वर्ण, यातील ब्राह्माण संपूर्ण अधिकार संपन्न व शूद हे अधिकार वंचित शूदांना सप्तबंदी लागू होती. यातील शिक्षण, संपत्ती, शस्त्र, रोटी, बेटी, तट व समुद उल्लंघन या सात बंदी यामुळे शूदवर्णाचे लोक अशिक्षित व दरिदी जीवन जगत होते. धर्मशास्त्राप्रमाणे शूद वर्णाच्या व्यक्तीने शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे डोळे काढावे, त्याची जीभ छाटावी व त्याच्या कानात शिसे ओतावे असा धर्म कायदा होता. सप्त बंदी कायद्याचा आधार घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला. संत तुकाराम महाराजांची गाथा बुडविली. छत्रपती शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड यांचे वेदोक्त प्रकरण गाजले आहे. मराठा समाज हा हक्क अधिकारापासून वंचित होता. म्हणजेच तो शूद्र आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्याने ख-या अर्थाने नवीन युगाला सुरुवात झाली. त्याची प्रेरणा घेऊन ब्रिटीश राजवटीमध्ये महात्मा जोतिराव फुले यांनी शूद समाजाला प्रबोधित करून आपल्या हक्कासाठी लढण्यास उद्युक्त केले. महात्मा जोतिबा फुले यांनी ब्रिटिशांकडे शूदवर्णाच्या अशिक्षित गोरगरीब समाजाला शिक्षण व विशेष सवलती देण्याची प्रथम मागणी केली. 'गुलामगिरी' या आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी शूद व अतिशूद समाजाची म्हणजेच शेती व शेतीवर उपजीविका करणाऱ्या लोकांची व्यथा मांडली आहे. शूद वर्ण म्हणजेच मराठा व आजचा इतर मागासवर्ग. अतिशूद म्हणजे अस्पृश्य व आदिवासी समाज, ज्याला आज आपण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती म्हणतो. महात्मा फुले यांनी शूद अतिशूदांसाठी मोठा सामाजिक लढा उभा केला. हे कार्य पुढे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या करवीर संस्थानामध्ये चालू केले. त्यांनी मोफत शिक्षण, मुलांसाठी सर्व जातींचे वसतीगृह व बहुजन समाजाला शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या राज्यामध्ये ५० टक्के आरक्षणाची व्यवस्था केली. त्यांनी ब्राह्माण, शेणवी, कायस्थ, पारशी वगळता उर्वरित मराठा बहुजन समाज हा शूदवर्णाचा असून शेतीवर उपजीविका करणारा अडाणी वर्ग आहे म्हणून त्यांना आरक्षण घोषित केले. छत्रपती शाहूमहाराजांच्या या कार्याचे प्रतिबिंब म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आरक्षणाची तरतूद केली. त्यांनी अतिशूद वर्णाच्या लोकांना आरक्षणाची व्यवस्था केली. १५ टक्के अनुसूचित जाती, साडेसात टक्के अनुसूचित जमातीसाठी ३४१ व ३४२ कलम टाकले व इतर मागासवगीर्यांसाठी ३४० कलमानुसार आयोग नेमण्याची व्यवस्था केली. ३४० व्या कलामानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित कराण्यास व आरक्षणाचा लाभ देण्यास भारत सरकारने चाल-ढकल केल्याने बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला व इतर मागासवगीर्यांच्या हक्क अधिकारासाठी लढा दिला.

भारतातील पहिला इतर मागासवगीर्यांसाठीचा आयोग म्हणजे १९५३ चा खा. काका कालेलकर आयोग. या आयोगाचे काम इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित करणे व त्यांच्या उन्नतीसाठी सूचना करणे हे होते. या आयोगापूवीर् ब्रिटीश राजवटीमध्ये आठ आयोग जाती निश्चिती करण्यासाठी झाले होते. त्यांनी काढलेले निष्कर्ष हा होता की १. शूद वर्णाचे लोक, २ ब्राम्हणेतर लोक. ३ शेती करणारे व शेतीवर उपजिविका करणारे म्हणजे इतर मागासवगीर्य लोक या आधारे व एकूण भारत देशाचा अभ्यास करून कालेलकरांनी २३९९ जाती निेश्चित केल्या. यामध्ये मराठा समाजाचा मराठा म्हणून समावेश केला आहे. परंतु हा अहवाल लागू करण्यात आला नाही. पुढे १९७७ मध्ये मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने ३७४३ जाती निेश्चत केल्या. १३४४ जाती वाढवल्या. पण शूदवर्णाच्या व शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला वगळले, याची त्यांनी कुठलीही कारणे दिली नाहीत. हा सरळ सरळ मराठा समाजावर अन्याय झाला आहे. मात्र देशभरामध्ये मराठा समाजासारखे जीवन जगणारे जाट, कुमीर्, अहिर, यादव, रेड्डी, गौडा, नायर व महंतो यांचा समावेश केला आहे. महाराष्ट्रात माळी, धनगर, वंजारी, तेली हेही सामाविष्ट झाले आहेत. १९९० मध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची घोषणा झाली. त्याला सवोर्च्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे १९९५ पर्यंत मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली नाही. इंदिरा साहानी विरुद्ध भारत सरकार या याचिकेमध्ये मागणी केली नसताना सवोर्च्च न्यायालयाने एक अन्यायकारक निर्णय देऊन ५० टक्केची मर्यादा घातली. केंद सरकारने नेमलेल्या खासदार नचिपन कमिटीने मात्र ही मर्यादा घटनाबाह्य असून ती रद्द करावी अशी शिफारस केंद सरकारकडे केली आहे. केरळमध्ये ७२ टक्के, कर्नाटकमध्ये ६९ टक्के, आंध्रात ६५ टक्के, राजस्थानात ६५ टक्के, महाराष्ट्रानेसुद्धा ५२ टक्के मर्यादा ओलांडली आहे. आता ५२ टक्के ओ. बी. सीं. ना ५२ टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. जो महाराष्ट्रात फक्त १९ टक्के मिळत आहे. हा ओबीसींवर अन्याय आहे सध्या फक्त पहिल्या टप्प्यातील नोकरीचा लाभ मिळत आहे. पण पदोन्नती, शिक्षण व राजकारणातला लाभ मिळत नाही. यावर मराठा व इतर मागासवगीर्य समाजाने एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे.

मराठा समाज ही जात नसून हा एक समूह आहे. आजच्या मराठ्यांची जात ही कुणबी आहे, हे अनेक वेळा ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध करता येते. देशाच्या राष्ट्रगीतात मराठा हा शब्द येतो. भारतीय सैन्यामध्ये मराठा बटालियन आहे. 'मराठा मेला तर राष्ट्रही मेले. 'मराठा विना राष्ट्र गाडा न चाले' असे म्हटले जाते. महाराष्ट्रात राहणारा तो मराठा. मराठी बोलणारा तो मराठा म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील बारा बलुतेदार मावळ्यांना मराठा संबोधले जात होते. यावरून स्पष्ट होते की मराठा ही जात नसून प्रदेशवाचक शब्द आहे. महात्मा फुले हे शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणजे कुणब्यांचा राजा असे म्हणतात. १८८१ च्या जनगणेमध्ये मराठा व कुणबी या भिन्न जाती नसून एकच आहे. नंतर बॉम्बे गॅझेटियरप्रमाणे मराठा व कुणब्यांमध्ये भेदाभेद नाही. मराठा कुणीबीचे विवाह न्यायालयाने वैध ठरवले. गॅझेटियर ऑफ इंडियानुसार मराठा-कुणबी यांच्यात फरक नाही. शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी. मराठा कुणबी समाजाचे लग्नविधी, कुलदैवत, परंपरा, सण, उत्सव एकच आहेत.

१ जून २००४ रोजी महाराष्ट्र सरकारच्या त्नक्र ८३ व्या दुरुस्तीप्रमाणे मराठा कुणबी व कुणबी मराठा यांना आरक्षणाचा लाभ मिळावा असे म्हटले आहे. वरील निर्णयावरून महाराष्ट्र सरकारला मराठा कुणबी एकच असल्याचे मान्य होते. कुणबी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतो. मात्र शूद वर्णाच्या शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला मात्र मिळत नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या समाजातील मोठा घटक असणाऱ्या मराठा समाजावर हा अन्याय आहे. आज मराठा समाजातील ८० टक्के तरुण हे दहावीनंतर शिक्षण सोडून देतात. कारण त्यांची आथिर्क परिस्थिती नसते व ग्रामीण शाळेमध्ये शिकल्यामुळे भाषेचा प्रश्ान् उद्भवतो. हा एक न्यूनगंड आहे. एकूण मराठा समाजातील ८२ टक्के लोक शेतीवर उपजीविका करत असतात. मुख्यत: निसर्गावर अवलंबून आहे. यातील ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. जिराईत शेतीचे मालक आहेत. म्हणून दारिद्य रेषेखाली जीवन जगत असतात. आत्महत्या करणाऱ्या ३७०० पैकी ३२४६ हे मराठा कुणबी समाजातील आहेत. कर्जबाजारीपणाने व्यथित आहे. आथिर्क दुर्बलतेमुळे सामाजिक स्तरही खालावला आहे. मागासवगीर्यांची व्याख्या करताना ज्या समाजाचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक आथिर्क दुर्बल आहेत व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना मागासवगीर्य समजावेत. आज महाराष्ट्रात मराठा समाजातील ८० टक्के समाज अशिक्षित आहे व ७० टक्के दारिद्य रेषेखाली जीवन जगत आहे. म्हणून तो मागासवगीर्य आहे व आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र आहे. आज मराठा समाज रोजगार हमी योजना, माथाडी कामगार, हमाली करणे अशा निकृष्ट दर्जाचे काम करून उपजीविका करत आहे. समाजाची संख्या मोठी असल्याने समस्याही खूप मोठ्या आहेत. सहकार चळवळ हे महाराष्ट्राला मराठा समाजाचे योगदान आहे. परंतु सरकारी धोरणामुळे सहकार चळवळ मोडकळीस आली आहे. राज्यकतेर् मराठा असल्यामुळे आपण मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्यास आपण जातीवादी ठरू अशी भीती बाळगतात. आजपर्यंत मराठा समाजाने स्वत:साठी ही पहिलीच मागणी केली आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाल्याने गेली अनेक वषेर् धुमसत असलेला आरक्षण समर्थक व आरक्षण विरोधक हा वाद संपुष्टात येईल व सामाजिक ऐक्य घडेल. छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला आरक्षणाचा लाभ दिला. आज शाहूंचा मराठा आरक्षणाची मागणी करतो तर त्याला आरक्षणाचे लाभधारक विरोध करतात. याचा खेद वाटतो. म्हणून धर्मवादी जातीव्यवस्था गाडण्यासाठी समता, बंधुता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देऊन राज्यर्कत्यांनी मनुवादाकडून मानवतावादाचा प्रवास पूर्ण करावा.
शिवस्मारक आदर्शवत व्हावे - संभाजी ब्रिगेड
सकाळ वृत्तसेवा
Saturday, May 30th, 2009 AT 11:05 PM
Tags: sambhaji brigade, shivdharma
कोल्हापूर - बहुजन इतिहास संशोधकांची मते घेऊन मुंबईतील शिवस्मारक नवीन पिढीला आदर्श ठरावे, अशी अपेक्षा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील व मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली.
दरम्यान, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी समितीचा मीच अध्यक्ष असल्याचा खुलासा काल केल्याने या वादावर पडदा पडला आहे. श्री. पाटील, डॉ. चव्हाण म्हणाले, ""समितीच्या सदस्यपदावरून बाबासाहेब पुरंदरे यांना दूर करावे. त्याचबरोबर मराठी माणसांसाठी काम करण्यापेक्षा भांडणे लावणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथम आपली मुले मराठी माध्यमाच्या शाळेत घालावीत.'' डॉ. चव्हाण म्हणाले, "जगाला आदर्श ठरेल असे शिवस्मारक मुंबईत व्हावे, ही मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. स्मारकाचा वाद हा पुरोगामी व प्रतिगामी शक्तींमधील आहे. श्री. पुरंदरे यांनी कोणत्याही संशोधनाशिवाय, संदर्भाशिवाय शिवाजी महाराजांविषयी लिहिलेली पुस्तके सुमार दर्जाची व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची अवहेलना करणारी आहेत. त्यांनी 2003 मध्ये लिहिलेल्या "राजा शिवछत्रपती' पुस्तकातील लिखाण वाचल्यानंतर जेम्स लेन यांच्या पुस्तकाचे मूळ कोठे आहे, हे समजून येते.''
ते म्हणाले, "श्री. पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखालील पुण्यातील लालमहाल, डेरवण (जि. रत्नागिरी) व सोलापूर येथे उभारलेली शिवसृष्टी वादाच्या भोवऱ्यात आहे. युती शासनाच्या काळात त्यांना पुणे जिल्ह्यातील दिलेल्या 25 एकर जमिनीवर काहीही झालेले नाही. आमचा वाद हा श्री. पुरंदरे किंवा राज ठाकरे यांच्याबद्दल नाही, तर वर्षानुवर्षे चाललेल्या सांस्कृतिक दहशतवादाबाबत आहे. म्हणून बहुजन इतिहास संशोधकांची मते घेऊन मुंबईतील स्मारक नवीन पिढीला आदर्श ठरावे.''

Friday, January 9, 2009











Monday, December 1, 2008


मराठा समाजातील लोकांनी काळाप्रमाणे बदलावे - पुरुषोत्तम खेडेकर
नांदेड, ता. ३० - मराठा समाजातील लोकांनी मराठी, हिंदी, इंग्रजी शिक्षणावर भर दिला पाहिजे. तेलगू, कानडी, जर्मनीही शिकायला पाहिजे. ज्याच्या घरात नाही ग्रंथाचे कपाट, तो होईल सपाट. मराठा समाजातील लोकांनी आता काळाप्रमाणे बदलले पाहिजे. फुकट कोणी देणार नाही; म्हणूनच जमेल ते उद्योग उभारा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या पाचव्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या समारोपात रविवारी (ता. ३०) केले. श्री. खेडेकर म्हणाले, मराठी चित्रपटांत पाटलाची भूमिका बहुतांशपणे निळू फुले करतात. सगळेच पाटील वाईट असतात का हो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिक्षणमंत्री वसंत पुरके हे चांगले निर्णय घेणारे मंत्री आहेत. शालेय पाठ्यपुस्तकात त्यांच्यामुळेच अनावश्‍यक भाग वगळला जातो. त्यामुळे या कर्तबगार मंत्र्याचे अभिनंदन केले पाहिजे. मराठीचा वाद तुम्हा-आम्हाला मातीत घालणारा आहे. आम्हाला मराठी राज्य नको, मराठा राज्य हवे आहे, असेही ते म्हणाले. मराठा समाजातील लोकांना आरक्षण सुविधा द्याव्यात, याबाबत आपली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे. कृषिमंत्री शरद पवार, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांनाही बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला पूर्ण मंजुरी दिली आहे. आता फक्त तांत्रिक बाबी तेवढ्या शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे या सर्वांचे आभार मानू. शिवधर्म ही माझी संकल्पना मराठा समाजातील लोकांना आता पटली आहे. समाजातील पाच कोटी लोकांपैकी दोन ते अडीच कोटी लोक शिवधर्माचे आचरण करत आहेत. शिवधर्मामुळे मराठा समाजाचे २० हजार कोटी रुपये वाचले आहेत, असेही ते म्हणाले. या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार बी. बी. ठोंबरे यांना सन्मानपूर्वक देण्यात आला. श्री. ठोंबरेंच्या कार्याचे कौतुक खेडेकरांनी केले. सुरेश हावरे यांनासुद्धा छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार होते. ते समारंभाला आले नाहीत. या वेळी माधवराव पाटील शेळगावकर, चंद्रभान पाटील जवळेकर आदींची उपस्थिती होती. चौथ्या सत्रात "तुकोबांचे वारकरी ः संभाजी ब्रिगेड' या विषयावरील परिसंवाद रंगला. या वेळी छाया महाले म्हणाल्या, मुंबईत बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या. अतिरेक्‍यांकडील शस्त्रास्त्रे अत्याधुनिक होती. आमच्याकडील हत्यारे मात्र बाबा आझमच्या काळातील होती. आमच्याजवळची हत्यारे, बंदुका कोणत्या काळातील आहेत, हे तपासून पाहिले नाही. त्यामुळेच हेमंत करकरेंसारखे अनेक अधिकारी शहीद झाले. करकरे हे तुकारामांचे वारकरी. अतिरेक्‍यांनी करकरे यांना संपवले. मराठा माणूस हा केव्हाही मरायला तयार असतो. मोडेल पण वाकणार नाही, असा त्याचा बाणा असतो. या वेळी सत्कारास उत्तर देताना बी. बी. ठोंबरे म्हणाले, की मी आज धन्य झालो. ज्या समाजात मी जन्मलो, त्या समाजाने मला हा बहुमान दिला आहे. संयोजक-अध्यक्षांचे मी ऋण व्यक्त करतो.

उन्नतीसाठी प्रक्रिया उद्योग काढावेत - ठोंबरे

या कार्यक्रमप्रसंगी सत्कारमूर्ती बी. बी. ठोंबरे म्हणाले, स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागाची उन्नती करायची असेल, तर शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग काढावेत. भाजीपाल्यावर प्रक्रिया करणारे उद्योग, सोयाबीनवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू केले तर ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होईल. अर्थसत्ता महत्त्वाची आहे. सांगणे सोपे असले तरी कृती अवघड आहे. मात्र तुम्ही संकल्प केला तर ते काही अवघड नाही. कचऱ्यावरच्या वीज निर्मितीचा प्रयोग आम्ही करतो. भाजीपाल्याचा प्रयोग औसा येथे केला. सेंद्रिय पद्धतीनुसार शेती करून भाजीपाला पिकवला व पॅकिंग करून तो मोठ्या शहरात पाठवला तर चार पैसे निश्‍चितच अधिक मिळतील. जगात अन्नधान्याची टंचाई निर्माण होणार नाही. शेती व्यवसायाला सोन्याचे दिवस येणार आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.

'मराठा समाजभूषण' पुरस्कार प्रदान

मराठवाड्यासारख्या मागास भागात खासगी साखर कारखानदारी निर्माण करून विविध विकास कामे उभी करणाऱ्या 'नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांना मराठा सेवा संघाच्यावतीने दिला जाणारा 'मराठा समाजभूषण पुरस्कार' रविवारी लातूर येथे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी बोलताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी आजची लढाई ढाल तलवारीची नसून ज्ञानाची आहे. त्यामुळे संगणक साक्षरता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे अवाहन केले. यावेळी डॉ. साहेबराव खंदारे यांच्या 'मराठ्यांचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास' या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

Friday, October 24, 2008

sambhaji brigade

संभाजी ब्रिगेड

"मराठा सेवा संघ" ह्या परिवर्तनवादी संघटनेची धगधगती युवा मशाल ....
जगाला "शिवधर्म" विचारधारा देण्याचे महत्वाचे काम करणारी ज्वलंत संघटना..

संभाजी ब्रिगेड अधिवेशन
पाहिले अधिवेशन- चंद्रपुर
विकृती संपविल्यानंतरच संस्कृतीची निर्मिती शक्‍य
ता. २८ - बहुजन महापुरुषांचा इतिहास वैदिक व्यवस्थेने विकृत केला आहे. आमचा लढा कोणत्याही जाती-धर्माविरुद्ध नाही.इतिहासांच्या पानांपानांवर असलेली विकृती मुळापासून नष्ट करणे हेच आमचे ध्येय आहे. त्यानंतरच खऱ्या संस्कृतीची निर्मिती होईल, असा सूर मराठा सेवा संघप्रणीत संभाजी ब्रिगेडच्या पहिल्या अधिवेशनात उमटला. येथील इंदिरा गांधी सभागृहात आयोजित या अधिवेशनाचे उद्‌घाटन सौरभ खेडेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवधर्माचे राज्यसमन्वयक देवानंद कापसे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पाल, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष आशाताई ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सचिव मनोज आखरे, माजी जिल्हाध्यक्ष सचिन राजूरकर, जगदीश जुनघरी आदींची उपस्थिती होते.
यावेळी सौरव खेडेकर म्हणाले, आमच्यासाठी भावनिक लढे महत्त्वाचे नाहीत, हक्कासाठी लढले पाहिजे. संभाजी ब्रिगेडच युवकांना दिशा देणारे संघटन आहे. त्याच्या माध्यमातून खरा इतिहास लोकांसमोर जात आहे. दादोजी कोंडदेव यांच्यारूपाने शिवचरित्रातील घाण लवकरच दूर होईल, हे आमच्या संघटनेचे यश आहे, याचा उल्लेख त्यांनी केला. बहुजन समाजातील तरुणांना आतापर्यंत वापरण्यातच आले. रक्त आमचे सांडले, सत्ता त्यांनी उपभोगली. यापुढे आम्ही आमच्या हक्कासाठी, आमच्याच लोकांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरू, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात अनंत चोंदे यांनी केले. भांडारकर संस्थेचा आम्ही निषेध केला, तो हल्ला नव्हता. जेव्हा आमचे लोक सल्ला, गल्ला देईल तेव्हा हल्लाही करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. यापुढचे आमचे लक्ष "शनिवार वाडा' असेल असा इशाराही त्यांनी दिला. उद्‌घाटनीय सत्रात अधिवेशनाच्या आयोजनामागील भूमिका संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विनोद थेरे यांनी मांडली. २०११ मध्ये संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अधिवेशन चंद्रपूरला होईल, असे त्यांनी सांगितले. संचालन हेमंत गौरकर यांनी केले. स्वागताध्यक्ष प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थितीत राहू शकले नाही. त्यांचा संदेश दिलीप चौधरी यांनी वाचून दाखविला. उद्‌घाटनीय सत्रानंतर "तरुणांचे आदर्श व बहुजन महापुरुष' यावर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता गंगाधर बनबरे यांनी मार्गदर्शन केले. बनबरे म्हणाले, बुद्धाचा जन्म भारतात झाला. बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर जपान आणि चीनने क्रांती केली. मात्र, आपण त्यांच्या कुळाचे असूनही आज आत्महत्या करीत आहोत. बहुजन पुरुषांचा स्वीकार करताना त्यांच्यावर लादलेले ब्राह्मणीकरण उखडून फेका. विकृती संपविल्याशिवाय संस्कृती निर्माण होत नाही, असेही ते म्हणाले. त्यानंतरच्या सत्रात "२१ व्या शतकातील तरुणांसमोरील आव्हाने' यावर प्रा. लीलाधर पाटील मार्गदर्शन केले. सायंकाळी पाच वाजताच जिल्हा रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहरात रॅली काढण्यात आली. इंदिरा गांधी सभागृह खचाखच भरले होते. बाहेर एलसीडीवर व्याख्यान ऐकण्याची सोय करण्यात आली होती.

संभाजी ब्रिगेड अधिवेशन- नांदेड
३१ नोव्हेंबर २००८
मर्द मराठा लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते उद्घाटन

संभाजी ब्रिगेड - सध्याचे कार्य

वाचा - मराठा आरक्षण - http://www.marathareservation.blogspot.com/

दादोजी कोडदेव प्रकरण - http://www.dadojikonddev.blogspot.com/