सरकारच्या निर्णयाचे संभाजी ब्रिगेडकडून स्वागत
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 02, 2010 AT 07:18 PM (IST)
पुणे - रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आंदोलन मागे घेतले. फटाके वाजवून आणि पेढेवाटप करून निर्णयाचे स्वागत करण्यात आले.केंद्रीय पुरातत्त्व विभागाने सर्व ऐतिहासिक स्थळांवर कार्यक्रम करण्यास मनाई केली आहे. या निर्णयाविरुद्ध आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात 'संभाजी ब्रिगेड'तर्फे धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. जंगली महाराज रस्त्यावरील पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू झाले. या वेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सारिका भोसले, शांताराम कुंजीर, संजयसिंह शिरोळे, संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, ज्योतिबा नरवडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, राज्य सरकारने रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा करण्यास परवानगी दिली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. उशिरा का होईना, पण लोकभावनेचा आदर करून निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात आले. फटाके वाजवून आणि पेढे वाटून आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
No comments:
Post a Comment