पुणे - या वेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले, ""महाराष्ट्रात शांतता हवी असेल तर लाल महालातील कोंडदेवांचा पुतळा तातडीने काढून टाकावा लागेल तसेच जेम्स लेनच्या पुस्तकाबाबत तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी लागेल.''
भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांनी आयोजित केलेल्या संघर्ष मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी झालेल्या सभेत आठ ठराव करण्यात मंजूर करण्यात आले. लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा 31 डिसेंबरपूर्वी हलविण्याबरोबरच जेम्स लेनच्या पुस्तकाबाबत सर्वोच्च न्यायालयात तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी, या प्रमुख ठरावांचा यात समावेश आहे.
"ज्या हिंदू धर्माच्या नावाने अभिमानाने गळे काढले जात आहेत. मात्र, असा कोणताही धर्म पुरातन काळापासून अस्तित्वात नाही. हिंदू हा आक्रमक मुघलांनी येथील जनतेविषयी वापरलेला अवमानकारक शब्द आहे, चातुर्वर्णाचा पुरस्कार करणाऱ्या उच्च वर्णियांनी बहुजन समाजाला फसविण्यासाठी हिंदू या शब्दाला धर्माचे स्वरूप प्राप्त करून दिले. बहुजनांनी यापासून दूर राहिले पाहिजे'', असे मत "बामसेफ'चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी रविवारी येथे व्यक्त केले. लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा 31 डिसेंबरपूर्वी हलविण्यात यावा, असा ठराव या वेळी करण्यात आला.
ब्रिगेडियर सुधीर सावंत, प्रा. प्रदीप सोळंके, प्रा. प्रदीप ढोबळे, मुफ्ती महंमद सय्यद, प्रा. श्रीमंत कोकाटे, व्ही. डी. गायकवाड, पाटील यांची या वेळी भाषणे झाली. ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर यांनी ठरावांचे वाचन केले. विकास पासलकर, रमेश राक्षे यांच्यासह अनेक पदाधिकारी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
इतिहासातले वाद मिटविल्याशिवाय वर्तमानातले वाद मिटणार नाहीत. लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा शांततेने हलवला जाणार नसेल, तर आम्ही तो हलवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला. संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चातर्फे रविवारी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम, सचिव व्ही. व्ही. जाधव, पुरुषोत्तम खेडेकर, मुफती मोहम्मद युसुफ, ब्रिगेडियर सुधीर सावंत आदी उपस्थित होते. समाजात शांतता हवी असेल तर विकृत इतिहास नको. आंदोलन जसे दादोजी कोंडदेव यांच्या विरोधात आहे, तसेच ते इतिहास विकृत करणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. आजपर्यंत शांततेने पुतळा हलवण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र आता तो हलवला गेला नाही, तर आमचे कार्यकर्ते हलवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बहुजन समाजाचा आजवर घातच केला आहे. जेम्स लेन प्रकरणातही सुप्रीम कोर्टात सरकारने चांगले वकील न पाठवल्याने निकाल विरोधात गेला. भांडारकर इन्स्टिट्यूटमधल्या अभ्यासकांनी लेनला मदत केल्यामुळे त्यांच्यावरही खटले भरण्याची मागणी त्यांनी केली. आपला खरा शत्रू कोण ते बहुजन समाजानाने ओळखण्याची गरज असल्याचे सावंत म्हणाले.
Tuesday, November 23, 2010
‘मराठीला कोणी संपवू शकणार नाही’
‘मराठीला कोणी संपवू शकणार नाही’ | |
मराठी मायबोली आहे, तिला कोणीही संपवू शकणार नाही, त्यामुळे युवकांनो तुम्ही राजकीय षड्यंत्राचे बळी पडू नका, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे महासचिव मनोज आखरे यांनी केले. संभाजी ब्रिगेडमुळे सिंधुदुर्गातील दादागिरी व गुंडगिरी संपुष्टात येईल, असा इशारा ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी देऊन मायनिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्यांना धडा शिकवू असे ते म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा संभाजी ब्रिगेडची स्थापना करण्यात आली. ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांचा ५५वा वाढदिवस संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेने साजरा करण्यात आला. यावेळी शिवराम राजे पुतळ्यास प्रथम पुष्पांजली वाहिल्यानंतर तेथून गवळी तिठापर्यंत मिरवणुकीने मेळाव्यात संभाजी ब्रिगेडची स्थापना करण्यात आली.
यावेळी ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांना वाढदिनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. विचार मंचावर संभाजी ब्रिगेडचे महासचिव मनोज आखरे, संघटक सोमेश्वर आहेर, मराठा सेवा समाजाचे रावराणे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ आदी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडची झेंडा स्थापना करून स्थापना करण्यात आली. त्यावेळी बोलताना महासचिव मनोज आखरे यांनी मराठा समाजासह बहुजन समाज संघटित करून दिशाहीन तरुणांना वैचारिक, आर्थिक क्रांतीचा मार्ग दाखविण्यासाठी संभाजी ब्रिगेडची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. युवक क्रांती घडवू शकतात म्हणूनच परिवर्तन घडवून आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड कार्यरत आहे. सामाजिक व सांस्कृतिक दहशतवाद निपटून काढण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.
संभाजी ब्रिगेडची स्थापना झाल्याने यापुढे सिंधुदुर्गात कोणाचीही दादागिरी, गुंडगिरी चालणार नाही. मायनिंग प्रकल्प राबवून शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्यांना धडा शिकविला जाईल, असा इशारा ब्रिगेडीअर सावंत यांनी दिला.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ यांनी नजीकच्या काळात संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात वैभव प्राप्त करून दाखवेल, असे उद्गार काढले. यावेळी मराठा सेवा समाजाचे रावराणे व संभाजी ब्रिगेडचे संघटक सोमेश्वर आहेर यांनी संभाजी ब्रिगेडची कार्यप्रणाली कथन केली.
प्रास्ताविक सुनील राऊळ, सूत्रसंचालन काका सावंत, तर आभार प्रदर्शन हर्षवर्धन धारणकर यांनी केले.
सरकारच्या निर्णयाचे संभाजी ब्रिगेडकडून स्वागत
सरकारच्या निर्णयाचे संभाजी ब्रिगेडकडून स्वागत
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 02, 2010 AT 07:18 PM (IST)
पुणे - रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आंदोलन मागे घेतले. फटाके वाजवून आणि पेढेवाटप करून निर्णयाचे स्वागत करण्यात आले.केंद्रीय पुरातत्त्व विभागाने सर्व ऐतिहासिक स्थळांवर कार्यक्रम करण्यास मनाई केली आहे. या निर्णयाविरुद्ध आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात 'संभाजी ब्रिगेड'तर्फे धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. जंगली महाराज रस्त्यावरील पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू झाले. या वेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सारिका भोसले, शांताराम कुंजीर, संजयसिंह शिरोळे, संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, ज्योतिबा नरवडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, राज्य सरकारने रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा करण्यास परवानगी दिली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. उशिरा का होईना, पण लोकभावनेचा आदर करून निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात आले. फटाके वाजवून आणि पेढे वाटून आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
Subscribe to:
Posts (Atom)