Tuesday, April 27, 2010

'जाणता राजा'चा प्रयोग उधळून लावू
23 Apr 2010, 0208 hrs IST








संभाजी ब्रिगेडचा इशारा

म. टा. वृत्तसेवा । कोल्हापूर

आबालवृद्धांपासून सर्वांनाच स्फूर्तिदायक असणारे शिवचरित्र रंगमंचावर जिवंत करून दाखवणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'जाणता राजा' या महानाट्यातील समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचे उदात्तीकरण करणारे प्रसंग अनेक प्रसंग आहेत. ते वगळले नाहीत, तर २८ एप्रिल रोजी कोल्हापुरात होणारे हे महानाट्य उधळून लावण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील यांनी दिला आहे.

आमचा या महानाट्याला विरोध नसून ब्राह्माणी प्रवृत्तीतून रंगवलेल्या इतिहासविरोधी प्रसंगांना आमचा विरोध आहे, असे पाटील म्हणाले. पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे. दादोजी कोंडदेव कुलकर्णी आणि रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत, हे संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर येथे होणारा 'जाणता राजा'चा प्रयोग येथील शाहू स्टेडियमवर रंगणार आहे.