"मराठा सेवा संघ" ह्या परिवर्तनवादी संघटनेची धगधगती युवा मशाल ....
जगाला "शिवधर्म" विचारधारा देण्याचे महत्वाचे काम करणारी ज्वलंत संघटना..
संभाजी ब्रिगेड अधिवेशन
पाहिले अधिवेशन- चंद्रपुर
विकृती संपविल्यानंतरच संस्कृतीची निर्मिती शक्य
ता. २८ - बहुजन महापुरुषांचा इतिहास वैदिक व्यवस्थेने विकृत केला आहे. आमचा लढा कोणत्याही जाती-धर्माविरुद्ध नाही.इतिहासांच्या पानांपानांवर असलेली विकृती मुळापासून नष्ट करणे हेच आमचे ध्येय आहे. त्यानंतरच खऱ्या संस्कृतीची निर्मिती होईल, असा सूर मराठा सेवा संघप्रणीत संभाजी ब्रिगेडच्या पहिल्या अधिवेशनात उमटला. येथील इंदिरा गांधी सभागृहात आयोजित या अधिवेशनाचे उद्घाटन सौरभ खेडेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवधर्माचे राज्यसमन्वयक देवानंद कापसे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पाल, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष आशाताई ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सचिव मनोज आखरे, माजी जिल्हाध्यक्ष सचिन राजूरकर, जगदीश जुनघरी आदींची उपस्थिती होते.
यावेळी सौरव खेडेकर म्हणाले, आमच्यासाठी भावनिक लढे महत्त्वाचे नाहीत, हक्कासाठी लढले पाहिजे. संभाजी ब्रिगेडच युवकांना दिशा देणारे संघटन आहे. त्याच्या माध्यमातून खरा इतिहास लोकांसमोर जात आहे. दादोजी कोंडदेव यांच्यारूपाने शिवचरित्रातील घाण लवकरच दूर होईल, हे आमच्या संघटनेचे यश आहे, याचा उल्लेख त्यांनी केला. बहुजन समाजातील तरुणांना आतापर्यंत वापरण्यातच आले. रक्त आमचे सांडले, सत्ता त्यांनी उपभोगली. यापुढे आम्ही आमच्या हक्कासाठी, आमच्याच लोकांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरू, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात अनंत चोंदे यांनी केले. भांडारकर संस्थेचा आम्ही निषेध केला, तो हल्ला नव्हता. जेव्हा आमचे लोक सल्ला, गल्ला देईल तेव्हा हल्लाही करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. यापुढचे आमचे लक्ष "शनिवार वाडा' असेल असा इशाराही त्यांनी दिला. उद्घाटनीय सत्रात अधिवेशनाच्या आयोजनामागील भूमिका संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विनोद थेरे यांनी मांडली. २०११ मध्ये संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अधिवेशन चंद्रपूरला होईल, असे त्यांनी सांगितले. संचालन हेमंत गौरकर यांनी केले. स्वागताध्यक्ष प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थितीत राहू शकले नाही. त्यांचा संदेश दिलीप चौधरी यांनी वाचून दाखविला. उद्घाटनीय सत्रानंतर "तरुणांचे आदर्श व बहुजन महापुरुष' यावर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता गंगाधर बनबरे यांनी मार्गदर्शन केले. बनबरे म्हणाले, बुद्धाचा जन्म भारतात झाला. बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर जपान आणि चीनने क्रांती केली. मात्र, आपण त्यांच्या कुळाचे असूनही आज आत्महत्या करीत आहोत. बहुजन पुरुषांचा स्वीकार करताना त्यांच्यावर लादलेले ब्राह्मणीकरण उखडून फेका. विकृती संपविल्याशिवाय संस्कृती निर्माण होत नाही, असेही ते म्हणाले. त्यानंतरच्या सत्रात "२१ व्या शतकातील तरुणांसमोरील आव्हाने' यावर प्रा. लीलाधर पाटील मार्गदर्शन केले. सायंकाळी पाच वाजताच जिल्हा रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहरात रॅली काढण्यात आली. इंदिरा गांधी सभागृह खचाखच भरले होते. बाहेर एलसीडीवर व्याख्यान ऐकण्याची सोय करण्यात आली होती.
संभाजी ब्रिगेड अधिवेशन- नांदेड
३१ नोव्हेंबर २००८
मर्द मराठा लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते उद्घाटन
संभाजी ब्रिगेड - सध्याचे कार्य
वाचा - मराठा आरक्षण - http://www.marathareservation.blogspot.com/
दादोजी कोडदेव प्रकरण - http://www.dadojikonddev.blogspot.com/