Monday, December 1, 2008


मराठा समाजातील लोकांनी काळाप्रमाणे बदलावे - पुरुषोत्तम खेडेकर
नांदेड, ता. ३० - मराठा समाजातील लोकांनी मराठी, हिंदी, इंग्रजी शिक्षणावर भर दिला पाहिजे. तेलगू, कानडी, जर्मनीही शिकायला पाहिजे. ज्याच्या घरात नाही ग्रंथाचे कपाट, तो होईल सपाट. मराठा समाजातील लोकांनी आता काळाप्रमाणे बदलले पाहिजे. फुकट कोणी देणार नाही; म्हणूनच जमेल ते उद्योग उभारा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या पाचव्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या समारोपात रविवारी (ता. ३०) केले. श्री. खेडेकर म्हणाले, मराठी चित्रपटांत पाटलाची भूमिका बहुतांशपणे निळू फुले करतात. सगळेच पाटील वाईट असतात का हो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिक्षणमंत्री वसंत पुरके हे चांगले निर्णय घेणारे मंत्री आहेत. शालेय पाठ्यपुस्तकात त्यांच्यामुळेच अनावश्‍यक भाग वगळला जातो. त्यामुळे या कर्तबगार मंत्र्याचे अभिनंदन केले पाहिजे. मराठीचा वाद तुम्हा-आम्हाला मातीत घालणारा आहे. आम्हाला मराठी राज्य नको, मराठा राज्य हवे आहे, असेही ते म्हणाले. मराठा समाजातील लोकांना आरक्षण सुविधा द्याव्यात, याबाबत आपली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे. कृषिमंत्री शरद पवार, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांनाही बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला पूर्ण मंजुरी दिली आहे. आता फक्त तांत्रिक बाबी तेवढ्या शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे या सर्वांचे आभार मानू. शिवधर्म ही माझी संकल्पना मराठा समाजातील लोकांना आता पटली आहे. समाजातील पाच कोटी लोकांपैकी दोन ते अडीच कोटी लोक शिवधर्माचे आचरण करत आहेत. शिवधर्मामुळे मराठा समाजाचे २० हजार कोटी रुपये वाचले आहेत, असेही ते म्हणाले. या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार बी. बी. ठोंबरे यांना सन्मानपूर्वक देण्यात आला. श्री. ठोंबरेंच्या कार्याचे कौतुक खेडेकरांनी केले. सुरेश हावरे यांनासुद्धा छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार होते. ते समारंभाला आले नाहीत. या वेळी माधवराव पाटील शेळगावकर, चंद्रभान पाटील जवळेकर आदींची उपस्थिती होती. चौथ्या सत्रात "तुकोबांचे वारकरी ः संभाजी ब्रिगेड' या विषयावरील परिसंवाद रंगला. या वेळी छाया महाले म्हणाल्या, मुंबईत बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या. अतिरेक्‍यांकडील शस्त्रास्त्रे अत्याधुनिक होती. आमच्याकडील हत्यारे मात्र बाबा आझमच्या काळातील होती. आमच्याजवळची हत्यारे, बंदुका कोणत्या काळातील आहेत, हे तपासून पाहिले नाही. त्यामुळेच हेमंत करकरेंसारखे अनेक अधिकारी शहीद झाले. करकरे हे तुकारामांचे वारकरी. अतिरेक्‍यांनी करकरे यांना संपवले. मराठा माणूस हा केव्हाही मरायला तयार असतो. मोडेल पण वाकणार नाही, असा त्याचा बाणा असतो. या वेळी सत्कारास उत्तर देताना बी. बी. ठोंबरे म्हणाले, की मी आज धन्य झालो. ज्या समाजात मी जन्मलो, त्या समाजाने मला हा बहुमान दिला आहे. संयोजक-अध्यक्षांचे मी ऋण व्यक्त करतो.

उन्नतीसाठी प्रक्रिया उद्योग काढावेत - ठोंबरे

या कार्यक्रमप्रसंगी सत्कारमूर्ती बी. बी. ठोंबरे म्हणाले, स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागाची उन्नती करायची असेल, तर शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग काढावेत. भाजीपाल्यावर प्रक्रिया करणारे उद्योग, सोयाबीनवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू केले तर ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होईल. अर्थसत्ता महत्त्वाची आहे. सांगणे सोपे असले तरी कृती अवघड आहे. मात्र तुम्ही संकल्प केला तर ते काही अवघड नाही. कचऱ्यावरच्या वीज निर्मितीचा प्रयोग आम्ही करतो. भाजीपाल्याचा प्रयोग औसा येथे केला. सेंद्रिय पद्धतीनुसार शेती करून भाजीपाला पिकवला व पॅकिंग करून तो मोठ्या शहरात पाठवला तर चार पैसे निश्‍चितच अधिक मिळतील. जगात अन्नधान्याची टंचाई निर्माण होणार नाही. शेती व्यवसायाला सोन्याचे दिवस येणार आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.

'मराठा समाजभूषण' पुरस्कार प्रदान

मराठवाड्यासारख्या मागास भागात खासगी साखर कारखानदारी निर्माण करून विविध विकास कामे उभी करणाऱ्या 'नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांना मराठा सेवा संघाच्यावतीने दिला जाणारा 'मराठा समाजभूषण पुरस्कार' रविवारी लातूर येथे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी बोलताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी आजची लढाई ढाल तलवारीची नसून ज्ञानाची आहे. त्यामुळे संगणक साक्षरता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे अवाहन केले. यावेळी डॉ. साहेबराव खंदारे यांच्या 'मराठ्यांचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास' या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

Friday, October 24, 2008

sambhaji brigade

संभाजी ब्रिगेड

"मराठा सेवा संघ" ह्या परिवर्तनवादी संघटनेची धगधगती युवा मशाल ....
जगाला "शिवधर्म" विचारधारा देण्याचे महत्वाचे काम करणारी ज्वलंत संघटना..

संभाजी ब्रिगेड अधिवेशन
पाहिले अधिवेशन- चंद्रपुर
विकृती संपविल्यानंतरच संस्कृतीची निर्मिती शक्‍य
ता. २८ - बहुजन महापुरुषांचा इतिहास वैदिक व्यवस्थेने विकृत केला आहे. आमचा लढा कोणत्याही जाती-धर्माविरुद्ध नाही.इतिहासांच्या पानांपानांवर असलेली विकृती मुळापासून नष्ट करणे हेच आमचे ध्येय आहे. त्यानंतरच खऱ्या संस्कृतीची निर्मिती होईल, असा सूर मराठा सेवा संघप्रणीत संभाजी ब्रिगेडच्या पहिल्या अधिवेशनात उमटला. येथील इंदिरा गांधी सभागृहात आयोजित या अधिवेशनाचे उद्‌घाटन सौरभ खेडेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवधर्माचे राज्यसमन्वयक देवानंद कापसे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पाल, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष आशाताई ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सचिव मनोज आखरे, माजी जिल्हाध्यक्ष सचिन राजूरकर, जगदीश जुनघरी आदींची उपस्थिती होते.
यावेळी सौरव खेडेकर म्हणाले, आमच्यासाठी भावनिक लढे महत्त्वाचे नाहीत, हक्कासाठी लढले पाहिजे. संभाजी ब्रिगेडच युवकांना दिशा देणारे संघटन आहे. त्याच्या माध्यमातून खरा इतिहास लोकांसमोर जात आहे. दादोजी कोंडदेव यांच्यारूपाने शिवचरित्रातील घाण लवकरच दूर होईल, हे आमच्या संघटनेचे यश आहे, याचा उल्लेख त्यांनी केला. बहुजन समाजातील तरुणांना आतापर्यंत वापरण्यातच आले. रक्त आमचे सांडले, सत्ता त्यांनी उपभोगली. यापुढे आम्ही आमच्या हक्कासाठी, आमच्याच लोकांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरू, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात अनंत चोंदे यांनी केले. भांडारकर संस्थेचा आम्ही निषेध केला, तो हल्ला नव्हता. जेव्हा आमचे लोक सल्ला, गल्ला देईल तेव्हा हल्लाही करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. यापुढचे आमचे लक्ष "शनिवार वाडा' असेल असा इशाराही त्यांनी दिला. उद्‌घाटनीय सत्रात अधिवेशनाच्या आयोजनामागील भूमिका संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विनोद थेरे यांनी मांडली. २०११ मध्ये संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अधिवेशन चंद्रपूरला होईल, असे त्यांनी सांगितले. संचालन हेमंत गौरकर यांनी केले. स्वागताध्यक्ष प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थितीत राहू शकले नाही. त्यांचा संदेश दिलीप चौधरी यांनी वाचून दाखविला. उद्‌घाटनीय सत्रानंतर "तरुणांचे आदर्श व बहुजन महापुरुष' यावर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता गंगाधर बनबरे यांनी मार्गदर्शन केले. बनबरे म्हणाले, बुद्धाचा जन्म भारतात झाला. बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर जपान आणि चीनने क्रांती केली. मात्र, आपण त्यांच्या कुळाचे असूनही आज आत्महत्या करीत आहोत. बहुजन पुरुषांचा स्वीकार करताना त्यांच्यावर लादलेले ब्राह्मणीकरण उखडून फेका. विकृती संपविल्याशिवाय संस्कृती निर्माण होत नाही, असेही ते म्हणाले. त्यानंतरच्या सत्रात "२१ व्या शतकातील तरुणांसमोरील आव्हाने' यावर प्रा. लीलाधर पाटील मार्गदर्शन केले. सायंकाळी पाच वाजताच जिल्हा रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहरात रॅली काढण्यात आली. इंदिरा गांधी सभागृह खचाखच भरले होते. बाहेर एलसीडीवर व्याख्यान ऐकण्याची सोय करण्यात आली होती.

संभाजी ब्रिगेड अधिवेशन- नांदेड
३१ नोव्हेंबर २००८
मर्द मराठा लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते उद्घाटन

संभाजी ब्रिगेड - सध्याचे कार्य

वाचा - मराठा आरक्षण - http://www.marathareservation.blogspot.com/

दादोजी कोडदेव प्रकरण - http://www.dadojikonddev.blogspot.com/